भाजपचे नगरसेवक शिवसेनेसोबत सहलीला
X
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 18 मार्चला होणार आहे. त्या अगोदरच महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. सत्ताधारी भाजपचे 57 पैकी तब्बल 25 हून अधिक नगरसेवक शिवसेना नेत्यांबरोबर सहलीला रवाना झाले आहेत.
या संदर्भात भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपचे फुटलेले नगरसेवक आपल्याकडे आले होते. त्यांनी माझ्याशी बातचीत केली. त्यानुसार शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर भाजपमधील फुटीर नगरसेवकांमधून होईल. असं सांगितलं. काय म्हटलंय खडसे यांनी...
गेले दोन अडीच वर्षे झाले. महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. मात्र, जळगाव शहराचं चित्र जर पाहिलं. तर ते विकासाच्या नव्हे तर अविकासाच्या दृष्टीने पावलं टाकणारं आहे. शहरामध्ये काम होत नाही. नगरसेवकांचं प्रशासन ऐकच नाही. अशा अनेक तक्रारी माझ्याकडं ही आलेल्या आहेत. अनेकांकडे गेलेल्या आहेत. आणि याचा परिणाम असा झाला. आता त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भाजप अधिक शिवसेना आणि एमआयएम असे मिळून 45 – 46 लोकांचा गट तयार झालेला आहे. या महापालिकेत सत्ताबदल करावं असा त्यांच्या लेव्हलला निर्णय झालेला आहे.
या सर्वांनी मिळून माझी भेट घेतली. त्यांनी सर्व परिस्थिती मला सांगितली. त्यानंतर मी त्यांना सांगितलं सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. तर करायला हरकत नाही. मी आता भारतीय जनता पार्टीत नाही. यात स्पष्ट आहे. महापौर कोण होणार शिवसेना ठरवेल आणि उपमहापौर जे भाजपचे फुटीर नगरसेवक आहेत. ते मी ठरवेल. असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.