Home > News Update > खडसे गिरीश महाजन यांना म्हणाले 1994 ची फरदापुरची घटना आठवा, काय आहे प्रकरण?

खडसे गिरीश महाजन यांना म्हणाले 1994 ची फरदापुरची घटना आठवा, काय आहे प्रकरण?

खडसे गिरीश महाजन यांना म्हणाले 1994 ची फरदापुरची घटना आठवा, काय आहे प्रकरण?
X

गिरिश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसे यांनी केलेल्या आक्षेपार्य वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांनी खडसेंना चांगलंच सुनावलं होतं. एकनाथ खडसेंना उच्च पदाची अपेक्षा असताना आमदारकी ही मिळाली नाही. वाढतं वय, आजारपण यामुळे बिचाऱ्या खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. अशा शब्दात गिरीश महाजन यांनी खडसे यांचा समाचार घेतला होता.

त्यानंतर आता खडसेंनी गिरिश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. माझं मानसिक संतुलन बिघडलं नाही. 1994 मध्ये फरदापुरच्या एका घटनेची आठवण करून देत खडसेंनी महाजन यांना डिवचलं आहे. पाणी प्रश्नावरून खडसेंचा फोन वरील संभाषण व्हायरल झाल्यानंतर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं वाकयुद्ध रंगले आहे.

खडसे नेमके काय म्हणाले?

महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील एका गावात पाणी येत नसल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने एकनाथ खडसेंना फोन वर केली होती. फोन वरील संभाषणात खडसेंनी तुमचा आमदार मेला का? पोरींचेच फोन उचलतो, बायकांमागे फिरतो अशी टीका केली होती. ते संभाषण प्रचंड व्हायरल झाल्यानंतर महाजन यांनी खडसेंना उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता खडसेंनी महाजन यांना उत्तर दिलं आहे.

Updated : 29 April 2021 7:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top