चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची आठ पथके तैनात
धम्मशिल सावंत | 23 Aug 2023 9:00 AM IST
X
X
चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची आठ पथके तैनात
आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आणि कोकण रेल्वेचे कर्मचारी चंद्रकांत कांबळे ड्युटीवर असताना डोक्यात गोळी झाडून अत्यंत निर्घृण अशी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हत्येमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, बीडीडीएस टीम, फिंगर एक्सपर्ट टीम व अन्य पथके या हत्येचा गतिमानतेने तपास करीत आहेत.
या घटनेने नंतर आंबेडकरी बहुजन समाज आक्रमक झाला आहे. आता रायगड पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Updated : 23 Aug 2023 9:00 AM IST
Tags: Raigad police investigate Chandrakant Kamble Chandrakant Kamble murder Chandrakant Kamble Raigad konkanrailway
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire