खाद्यतेलाच्या देशांतर्गत वाढत असलेल्या दाराला लगाम ; खाद्य तेलांच्या करात कपात
X
खाद्यतेलाच्या देशांतर्गत वाढत असलेल्या दाराला लगाम घालण्याकरिता केंद्र सरकारने विविध खाद्यतेलांच्या आयातीवर असलेल्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून २.५ टक्के तर कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या सूर्यफूल तेलावर असलेल्या शुल्क ७.५ टक्क्यांवरून २.५ टक्के आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान या नव्या निर्णया नंतर रिफाईंड पाम तेल, रिफाईंड सोयाबीन तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेलाचे आयात शुल्क ३७.५ टक्केवरून ३२.५ टक्क्यांवर आणण्यात आल्याचे वृत्त आहे. आजपासून ही कपात लागू करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२१ पासूनच खाद्य तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून आयात कर कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या शुल्क कपातीमुळे देशांतर्गत तेलाच्या दरात कमी होण्याची अपेक्षा आहे.
आयात शुल्क कमी करण्याबरोबरच, कच्च्या पाम तेलाकरिता कृषी उपकर १७.५ टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला आहे. खाद्य तेल आयात करासाठी वर्षाकरिता १,१०० कोटी रुपये एवढा खर्च आहे.दरम्यान या शुल्क कपातीमुळे ग्राहकांपर्यंत ४,६०० कोटी रुपयांचा लाभ पोहोचणे अपेक्षित आहे.