Home > News Update > प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाही:नारायण राणे

प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाही:नारायण राणे

प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाही असे मत भाजपा खासदार नारायण राणे यांनी सरनाईक यांच्यावर पडलेल्या ईडीच्या छाप्याबाबत बोलताना व्यक्त केले.

प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाही:नारायण राणे
X

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथकाच्या कारवाईवर बोलताना भाजपा खासदार नारायण राणेंनी कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्याशिवाय याबाबत बोलणं उचित ठरणार नाही असे सांगितलं.

प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये धाड टाकून विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं कळत आहे.

टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील १० ठिकाणी शोधमोहीम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथकानं कारवाई केली. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.

Updated : 24 Nov 2020 4:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top