Home > News Update > EDची मोठी कारवाई, कोस्टल एनर्जी कंपनीच्या प्रमोटरला अटक

EDची मोठी कारवाई, कोस्टल एनर्जी कंपनीच्या प्रमोटरला अटक

EDची मोठी कारवाई,  कोस्टल एनर्जी कंपनीच्या प्रमोटरला अटक
X

सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने शुक्रवारी एक मोठी कारवाई केली आहे. ५६४ कोटी ४८ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणी Coastal Energy Private Limited या कंपनीचे प्रमोटर अहमत एआर बुहारी यांना अटक केली आहे. चेन्नईमध्ये मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. कमी प्रतीचा कोळसा उच्च दर्जाचा आहे असे भासवून जादा किमतीला विकला आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अहमद एआर बुहारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील काही अनोळखी अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने मनी लाँडरिंग प्रकरणी एफआयर दाखल केल्यानंतर EDने ही कारवाई केली आहे. याच प्रकरणात महसूल गुप्तवार्ता विभागानेही चौकशीला सुरूवात केली आहे. EDने केलेल्या चौकशीमध्ये बुहारी यांच्या देशांतर्गत आणि देशाबाहेर मॉरिशस, ब्रिटीश व्हर्जीन आयलंड्स इथेही मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. तसेच Coastal Energy Private Limited, Coastal Energen Private Limited, तसेच Coal & Oil Group Dubai या कंपन्याही बुहारी यांच्या असल्याची माहिती इडीने आपल्या निवेदनात दिली आहे.

EDची मोठी कारवाई, कोस्टल एनर्जी कंपनीच्या प्रमोटरला अटकCoastal Energy Private Limited या कंपनीने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पुरवलेला कोळसा कमी उष्मांक असलेला होता, पण तोच कोळसा जास्त उष्मांक असल्याचे भासवून त्याप्रमाणे कंपन्यांकडून पैसे घेतले गेले. वास्तविक CEPL किंवा MMTCने आपल्या निविदांमध्ये जास्त उष्मांकाचा कोळसा आवश्यक असल्याची अट घातली होती, पण खोटी प्रमाणपत्र आणि नमुन्यांच्या चाचणीचे खोटे अहवाल सादर करुन ह्या निविदा मिळवल्या गेल्या. एवढेच नाही तर कोळसा कमी प्रतीचा असल्याची माहिती देखील दडवून ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याचबरोबर ईडीच्या चौकशीत बुहारी यांनी सार्वजनिक कंपन्यांकडून लुबाडलेला पैसा CEPL आणि CNO या आपल्या समुहाच्या UAEमधील कंपन्यांमध्ये वळता केला. त्यानंतर तोच पैसा भारतातील Coastal Energen Pvt. Ltd या कंपनीमध्ये गुंतवण्यासाठी

Precious Energy Holdings Ltd, BVI आणि Mutiara Energy Holdings Ltd या कंपन्यांमार्फत भारतात परत आणल्याचे ईडीने सांगितले आहे.


Updated : 4 March 2022 5:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top