Home > News Update > ईडी`कडून टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

ईडी`कडून टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

ईडी`कडून  टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
X

बनावट टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्य़ावरून ईडीने हा गुन्हा नोंदविला आहे.

वाहिन्यांच्या जाहिरातींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या 'टीआरपी'मधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर रेटिंग एजन्सी 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने' (बीएआरसी) तक्रार नोंदविली होती. वाहिन्यांना जाहिरातींमधून मिळणारा महसूल वाढावा यासाठी लाच दिल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. या प्रकरणी 'रिपब्लिक' वाहिनीसह, 'फक्त मराठी', 'बॉक्स सिनेमा' यांची नावे समोर आली आहेत. यात मुंबई पोलिसांच्या तक्रारीत नमूद माध्यम समूहांचे अधिकारी आणि इतर आरोपींना चौकशीसाठी ईडीकडून लवकरच समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 'हंसा रिसर्च ग्रुप'च्या कर्मचाऱ्यांसह काही वाहिन्यांच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी वाहिन्यांच्या उच्चाधिकाऱ्यांना समन्स बजावून त्यांची चौकशी केली आहे. मध्यंतरी उत्तप्रदेशात सीबीआय मार्फत टीआरपी घोटाळा चौकशीचा प्रयत्न देखील करुन झाला. आता ईड़ी मार्फत टीआरपी घोटाळा चौकशी सुरु झाल्यानं पुन्हा एकदा रिपब्लिक वाहीनीच्या अर्णब गोस्वामींना पुन्हा एकदा वाचविण्याचे प्रयत्न तर सुरु नाहीत ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Updated : 22 Nov 2020 12:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top