Home > News Update > शिवसेनेच्या आणखी एका नेत्यावर EDची कारवाई, ११ कोटींची मालमत्ता जप्त

शिवसेनेच्या आणखी एका नेत्यावर EDची कारवाई, ११ कोटींची मालमत्ता जप्त

शिवसेनेच्या आणखी एका नेत्यावर EDची कारवाई, ११ कोटींची मालमत्ता जप्त
X

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्ता EDने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आता शिवसेनेच्या आणखी एका मोठ्या नेत्याची मालमत्ता EDने जप्त केली आहे. शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला जातो आहे. य़ा कारवाईमुळे शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एकीकडे ईडीने राष्ट्रवादीचे दोन मंत्री तुरुंगात टाकले आहेत. तर दुसरीकडे आता किरीट सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचेही नाव मनी लाँडरिंगमध्ये असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.

NSEL घोटाळा प्रकरणात EDने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता ठाण्यामधील असून यामध्ये दोन फ्लॅट आणि भूखंडाचा समावे आहे. EDने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत एकूण जप्त मालमत्तेची किंमत ही तीन हजार २५४ कोटी रुपये एवढी आहे.

2013 मध्ये NSEL घोटाळा प्रकरणी पहिल्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाचा तपास EDने सुरू केला आहे. या घोटाळा प्रकरणी कंपनीच्या संचालकांसह 25 जणांविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली चौकशी सुरू केली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, स्वत:च्या कर्जाची परतफेड तसेच इतर कामांसाठी अनधिकृतपणे वापरल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातील पैसा प्रताप सरनाईक यांच्या कंपन्यांच्या खात्यात आला होता, असा आरोप आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रताप सरनाईक यांच्या मुलाचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने भाजपसोबत आघाडी करावी अशी मागणी जाहीरपणे केली होती. त्यानंतर ईडीची कारवाई थंडावली होती. पण आता ईडीने अचानक कारवाई केल्याने सरनाईक यांच्यासह शिवसेनेच्याही अडचणी वाढल्या आहेत.

Updated : 25 March 2022 4:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top