राष्ट्रवादीला धक्का, महाराष्ट्रात ED ची मोठी कारवाई
एकीकडे दिल्लीत सोनिया गांधी यांची ED कडून चौकशी सुरू असतानाच ED ने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे.
X
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ED कडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान ED ने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल पटेल हे ED च्या रडारवर आले आहेत. त्यातच ईडीने प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील वरळी परिसरातील सीजे हाऊस इमारतीमधील चौथ्या मजल्यावर असलेली संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
इक्बाल मिरची प्रकरणात ED ने ही कारवाई केली आहे. तर याच इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेली मालमत्ता यापुर्वीच ईडीने जप्त केली होती. त्यापाठोपाठ आता पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांच्याभोवती ईडीने फास आवळायला सुरूवात केली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल अडचणीत आले आहेत.
प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. तर प्रफुल पटेल यांची यापुर्वी दोन वेळा चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये ईडीला प्रफुल पटेल यांच्या मालमत्ता व्यवहाराविषयीच्या नोंदीमध्ये अनियमितता आढळली. तसेच इक्बाल मिर्चीसोबतच्या व्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे हा शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.