Home > News Update > Money laundering case: ओमकार बिल्डर्सच्या अध्यक्ष कमल गुप्ता ला अटक...

Money laundering case: ओमकार बिल्डर्सच्या अध्यक्ष कमल गुप्ता ला अटक...

Money laundering case: ओमकार बिल्डर्सच्या अध्यक्ष कमल गुप्ता ला अटक...
X

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) ने बांधकाम व्यवसायात नावाजलेली कंपनी असलेल्या ओमकार बिल्डर्स चे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली आहे. एसआरए घोटाळ्या प्रकरणी चौकशीत सहकार्य करत नसल्याचं कारण देत ही अटक करण्यात आल्याचं ED ने म्हटलं आहे.

अंमलबजावणी संचालनालयने या अगोदर ओमकार बिल्डर्स च्या 10 कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या अधारावर अंमलबजावणी संचालनालयाने कंपनीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना अटक केली आहे. या दोघांनाही गुरुवारी पीएमएलए (मनी लांड्रिंग न्यायालयात) हजर करण्यात य़ेणार आहे.

काय आहे प्रकरण?

बांधकाम व्यवसायाशी निगडीत असलेल्या ओमकार बिल्डर्स या कंपनीने विविध बॅंकाकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं. या कर्जामध्ये येस बँकेकडून मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी घेतलेल्या 450 कोटी रुपयांचा समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयने या कर्जाच्या रकमेची अफरातफर केल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे. तसंच या कंपनीने झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप देखील या कंपनीवर केला जात आहे.

काय म्हटलंय कंपनीने?

ओमकार कंपनीच्या मते कंपनीने कोणताही नियमांचा भंग केलेला नाही. सर्व काम कायदेशीर केलं जात आहे. ही एक नियमित चौकशी असल्याचा दावा देखील कंपनीने केला होता. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिके संदर्भात ही चौकशी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत येस बॅंकेच्या पैशाची ओमकार बिल्डर्सने अफरातफर केली असल्याचं म्हटलं आहे.

येस बॅंक चे सह-प्रवर्तक राणा कपूर (63) आणि या घोटाळ्यात अडकलेली कंपनी दीवान हाउसिंग फाइनेंस लि. (डीएचएफएल) चे प्रवर्तक कपिल वधावन यांच्यासह धीरज वधावन यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे.

राणा कपूर यांच्यावर आर्थिक अनियमितता आणि येस बॅंकेचा वापर करत मोठ मोठ्या कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा आरोप आहे. या कर्जाच्या बदल्यात कपूर यांच्या नातेवाईकांना लाच देण्यात आल्याच्या प्रकरणात कपूर यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली आहे.

Updated : 28 Jan 2021 7:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top