Home > Max Political > मनमोहन सिंग यांच्या भाषणावर निर्मला सितारामन संतापल्या

मनमोहन सिंग यांच्या भाषणावर निर्मला सितारामन संतापल्या

मनमोहन सिंग यांच्या भाषणावर निर्मला सितारामन संतापल्या
X

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगाच्या भाषणावर भाजप संतापली असून आता थेट वित्तमंत्री निर्मला सितारामन खवळल्या आहेत, "पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तुम्ही हे सगळं बोलताय का?," असा सवाल सीतारमन यांनी केला.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कठोर शब्दात टिका करत हल्ला चढवला होता. पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने मनमोहन सिंग यांचा पंजाबी भाषेतला एक व्हिडीओ ट्विट केला. तुम्ही स्वतच्या चुका सुधारण्याऐवजी प्रत्येक समस्येला पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना दोषी ठरवत आहात,त्याचप्रमाणे नेत्यांना बळजबरीने मिठी मारुन, बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत, असं मनमोहन सिंग म्हणाले होते. आता अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

मनमोहन सिंग यांनी यांना भारताला सर्वात कुमकुवत बनवल्याबद्दल आणि महागाई वाढवल्याबद्दल ओळखलं जातं. मला तुमच्याबद्दल खुप आदर आहे. परंतु मला तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती.पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही हे सगळं बोलताय का,असा सवाल त्यांनी केला.निर्मला सितारामन यांनी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांच्या अर्थव्यवस्थेवरुन टीका केली आहे.

देशातील परिस्थिती गंभीर असून कोरोनाच्य़ा काळातील केंद्राच्या दुरदृष्टीच्या अभावामुळे अर्थव्यवस्थेची दुरवस्था झाली आहे.लोकांना महागाई आणि बेरोजगारी सहन करावी लागत आहे.श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होऊ लागले आहेत.साडेसात वर्षे सरकार चालवल्यानंतरही स्वत:च्या चुकांचे खापर पं नेहरुंवर टाकले जात आहे.असे मनमोहन सिंग म्हणाले होते.

Updated : 18 Feb 2022 2:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top