Earthquake : दिल्ली हादरली, पाकिस्तानमध्ये दोन मृत्यू
दिल्ली पुन्हा भुकंपाने हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
X
देशाची राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे. या दुर्घटनेनंतर हजारो लोक रस्त्यावर आल्याचे पहायला मिळाले. दिल्लीच्या शकरपूर परिसरात एक इमारत झुकली आहे, अशी माहिती मिळाली आहे.
दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. देशभरात विशेषत: दिल्ली-एनसीआर (Delhi- NCR) भागात भूकंपाचे धक्के जास्त प्रमाणात जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत ३० सेकंदांपेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची नेमकी तीव्रता किती होती? हे अद्याप स्पष्ट नाही झाले आहे. तथापि, सहा रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा अंदाज आहे. या घटनेमुळे दिल्लीतील जनता प्रचंड घाबरली आहे. याव्यतिरिक्त, भूकंपाते तीव्र धक्के भारतासह, तजाकिस्तान आणि चीनमध्ये सुद्धा जाणवल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) काही भागात ६.८ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा तीव्र धक्का बसल्याने २ ठार, ६ जखमी झाले आहेत.
रात्री 10.17 च्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडू लागले. रात्रीची वेळ असल्याने बहुसंख्य लोक घरातच होते. अनेकजण झोपेची तयारी करत होते. अनपेक्षितपणे भूकंप झाला. त्यावरून गदारोळ उठला. भूकंपाचे धक्के जाणवताच मोठ्या संख्येने लोक घरं सोडून रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यावर स्थानिकांची रस्त्यावर गर्दी झाली.
Earthquake of Magnitude:6.6, Occurred on 21-03-2023, 22:17:27 IST, Lat: 36.09 & Long: 71.35, Depth: 156 Km ,Location: 133km SSE of Fayzabad, Afghanistan for more information Download the BhooKamp App https://t.co/kFfVI7E1ux @ndmaindia @Indiametdept @moesgoi @PMOIndia pic.twitter.com/sJAUumYDiM
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) March 21, 2023
इमारत झुकण्याच्या घटनांची माहिती
या भूकंपात दिल्लीच्या शकरपूर मेट्रो पिल्लर 51 जवळ थेट इमारत झुकल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली-एनसीआर भागात सर्वाधिक नुकसान झाले. या घटने नंतर मेट्रो ची सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली. थोडक्यात, भूकंपामुळे दिल्लीकरांची खळबळ उडाली आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National center for seismology) माहिती दिली की भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील (Afghanistan) फैजाबाद (Faizabad) होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी होती. त्यामुळे दिल्लीतही भूकंपाचे काही जोरदार धक्के जाणवले. भूकंप इतके तीव्र होते की अग्निशमन दलाला मिळालेल्या माहिती नुसार दिल्लीच्या शकरपूर (Shakarpur delhi) परिसरात एक इमारत झुकली आहे.