#Maharashtrarain : नांदेडमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस, गोदावरीला पूर
X
नांदेड जिल्ह्यात गेल्या ४८ तासापासून मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. विष्णुपुरी धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर मुखेडमधील मोतीनाला येथे वाहत्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना घडली आहे. कार चालकाने झाडाचा आधार घेतल्याने त्याचा जीव मात्र वाचला आहे.
नांदेड शहरातील मध्यभागी असलेला गोवर्धन घाट पूल पाण्याखाली गेला आहे. आसना नदीला पूर आल्याने नांदेड - मुदखेड रस्ता बंद झाला आहे. तर अर्धापुर तालुक्यात चाभरा, पिंपळगाव या गावातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. कार्ला, पळसगाव मार्गावरील पुल पाण्याखाली गेल्याने, उमरी शहराकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. अंबुलगा पुलावरून पाणी वाहत असल्याने कंधार - मुखेड वाहतूक बंद कऱण्यात आली आहे. तर बिलोली तालुक्यात लघुळ गावाला पाण्याचा वेढा पडला आहे, बडूर येथे अनेक गावात शिरले पाणी.