Home > News Update > अतिवृष्टीने मोठे नुकसान, शेतीचे नुकसान, पशुधन वाहून गेले

अतिवृष्टीने मोठे नुकसान, शेतीचे नुकसान, पशुधन वाहून गेले

अतिवृष्टीने मोठे नुकसान,  शेतीचे नुकसान, पशुधन वाहून गेले
X

बीड जिल्ह्यात पावसानं सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तब्बल 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आतापर्यंत 160 जनावरांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाकडे करण्यात आलीय. तर मांजरा आणि माजलगाव या मोठ्या धरणांसह 144 धरण प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामध्ये शेतीसह जनावरांना देखील मोठा फटका बसलाय. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी शेतातील पाणी कमी झालेलं नाहीये.

या परिस्थितीमुळे संपूर्ण पिकांची वाताहात झाली असून अनेक ठिकाणी पिक पाण्यात तरंगतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मांजरा आणि माजलगाव या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचा परिणाम म्हणजे हे पाणी अनेक गावात शिरले असून काही ठिकाणी संपूर्ण गावाला पाण्याचा विळखा पडला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच एनडीआरएफ आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने अजूनही बचावकार्य सुरूच आहे. दरम्यान या मोठ्या वित्तहानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हेक्टरी पन्नास हजारांची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Updated : 29 Sept 2021 2:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top