कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका, NDRFच्या टीम तैनात
X
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत, ठाण्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण संततधार पाऊस सुरूच आहे. एनडीआरएफची राज्यात १६ पथके तैनात असून ४ पथके कोल्हापूरमध्ये आहेत. कोल्हापूरला पंचगंगा आणि रत्नागिरी येथे कोदवली, रायगड येथे कुंडलिका, सावित्री या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. पुणे विभागीय आयुक्त व कोकण विभागीय आयुक्त यांना पुर परिस्थिती असल्यास त्या त्या भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करावे व त्यांना कुठली गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा...
#sushantsinghrajputCase – CBIची कारवाई सुरू, 6 जणांविरुद्ध FIR दाखल
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीवर शिक्कामोर्तब
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान
रायगड जिल्ह्यात सध्या महाड येथे इंडियन कोस्ट गार्ड, मुरूड व पेण येथे NDRF,पुणे या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी रायगडमध्ये वीजेचे 22 पोल कोसळले आहेत. त्यामुळे काही भागात दोन दिवस वीजपुरवठा खंडित झालेला आहे. सावित्री नदीने धोका पातळी ओलाडंली तर कुडंलिका नदी इशारा पातळीच्या वर आहे.