आरोग्य विभागातील दलालांमुळे परीक्षा रद्द- देवेंद्र फडणवीस
टीम मॅक्स महाराष्ट्र | 25 Sept 2021 1:31 PM IST
X
X
आरोग्य विभागाच्या परीक्षा वारंवार रद्द होत आहेत, सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आरोग्य विभागाच्या परीक्षा वारंवार रद्द होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा अन्यथा आम्ही आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच आरोग्य विभागात काही दलाल सक्रिय झाले आहेत आणि लाखो रूपये घेऊन काम करत आहेत व दलालांमुळे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Updated : 25 Sept 2021 1:31 PM IST
Tags: Devendra fadnavis bjp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire