इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांच्या घरावर ड्रोनने हल्ला
X
नवी दिल्ली : इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी (Iraq PM Mustafa al-Kadhemi) यांच्या घरावर ड्रोनने हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एएफपी या न्यूज एजन्सीने याबाबत ट्वीट केले आहे.
रिपोर्ट्सनुसार, स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनच्या माध्यमातून इराकचे पंतप्रधानांच्या घरावर हल्ला करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी हे सुरक्षित आहेत.
बगदादच्या ग्रीन झोनमध्ये असलेल्या मुस्तफा अल कदीमी यांच्या घरावर ड्रोन हल्ल्यानंतर इराकचे पंतप्रधान कदीमी यांनी म्हटले आहे की, ते पूर्णपणे सुरक्षित आणि ठीक आहेत. तसेच त्यांनी सर्व नागरिकांना शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
या ड्रोन हल्ल्यात काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. इराकच्या सैन्य दलाकडून या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करुन सांगण्यात आले आहे की, ही हल्ला ग्रीन झोन बगदाद येथे असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर करण्यात आला आहे.