Home > News Update > सनातन सारख्या संस्था समाजविघातक, दाभोलकर हत्या प्रकरणी CBIचे प्रतिज्ञापत्र

सनातन सारख्या संस्था समाजविघातक, दाभोलकर हत्या प्रकरणी CBIचे प्रतिज्ञापत्र

सनातन सारख्या संस्था समाजविघातक, दाभोलकर हत्या प्रकरणी CBIचे प्रतिज्ञापत्र
X

पुण्यात २० ऑगस्ट २०१३ मध्ये अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकरांची ओंकारेश्र्वर मंदीराजवळ हत्या करण्यात आली. याचा तपास सीबीआयकडे आहे. केंद्रीय तपासयंत्रणेनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे याच्या जामीनाला विरोध केला. हिंदू विरोधी विचारसरणीच्या लोकांना हे कट्टरतावादी शत्रू समान मानून त्यांचा खातमा करणं हाच त्यावरचा उपाय मानतात असं सीबीआयनं यात म्हटलेलं आहे.

वीरेंद्र तावडेनं मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. याला विरोध करत सीबीआयनं नुकतंच आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. तावडे हा समाजात तणाव निर्माण करणा-या कट्टर संस्थांसाठी करतो, त्यामुळे त्याला जामीन मंजूर केल्यास समाजात तणाव निर्माण होऊन समाजातील एकात्मतेला धोका पोहचू शकेल, असंही सीबीआयनं यात म्हटलेलं आहे.

सकाळी मॉर्निंग वॉकल जात असताना गोळी झाडुन हत्या करण्यात आली होती.विरेंद्र तावडे हा कटाचा मास्टरमाइंड असुन त्याने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या हल्लेखोरांना तिथे आणलं होतं.असा आरोप सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात ठेवला आहे.

कट्टरतावादी लोकांना विरोध केल्याच्या कारणामुळेच डॉ. दाभोलकर यांची हत्या घडविण्यात आली, असा दावाही सीबीआयनं यात केलेला आहे. याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे एकमेकांशी गुंतलेले असल्यानं या सर्व हत्या एका कटाचा भाग आहेत असंही केंद्रीय तपासयंत्रणेनं स्पष्ट केलं आहे. वीरेंद्र तावडेला याप्रकरणी तपासयंत्रणेनं साल 2016 मध्ये अटक केली होती.

Updated : 11 Feb 2022 3:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top