Home > Max Political > नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं

नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं

काँग्रेस हायकमांडनं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना चांगलाच दणका दिला आहे. नितीन राऊत यांच्याकडून अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे

नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं
X

नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव काँग्रेस हायकमांडने चांगलाच मनावर घेतला आहे.

काँग्रेसने यासंदर्भात विदर्भातील काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं. या तीन बड्या नेत्यांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांचा समावेश होता.

काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत नितीन राऊत आणि सुनील केदार यांना काँग्रेसच्या शिर्षस्थ नेतृत्वाने समज दिल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं.

त्यानंतर आता काँग्रेस हायकमांडनं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना चांगलाच दणका दिला आहे.

नितीन राऊत यांच्याकडून अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे. आता ही जबाबदारी माझी आमदार राजेश लिलोठीया यांच्याकडे देण्यात आली आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी माहिती दिली आहे.

काँग्रेसने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, राजेश लिलोठीया यांच्याकडे अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाची तर के. राजू यांच्याकडे अनुसूचित जाती, ओबीसी, अल्पसंख्यांक आणि अखिल भारतीय आदिवासी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Updated : 26 Dec 2021 9:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top