जुळ्या बहिणींशी लग्न करणारा नवरा मुलगा अडचणीत, राज्य महिला आयोगाने घेतली दखल
X
अकलूज मध्ये 2 डिसेंबर ला एका मुलाचं दोन जुळ्या बहिणींशी लग्न लागल्यानंतर लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चांगलीच चर्चा रंगली, मात्र नंतर ह्याच लग्नामुळे नावऱ्या मुलाच्या अनेक अडचणींना सामोरे जाव लागत आहे. मूलविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दखल घेत सोलापूर पोलीस अधीक्षकांना टॅग करत या लग्नाच्या चौकशी करण्याच्या सूचना करत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
काय आहे या लग्नाची कहाणी
2 डिसेंबर ला अकलूज मध्ये अतुल अवताडे या तरुणांन रिंकी आणि पिंकी या दोन जुळ्या बहिणींशी मोठ्या आनंदात आपल्या परिवार आणि मित्रमंडळींसमोर लग्न लागलं. दोघा बहिणींनी एकाच वेळी अतुलच्या गळ्यात वरमाळा घालून विवाहबद्ध झाले. या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. रिंकी आणि पिंकी ह्या मुंबईच्या कांदिवली येथ राहतात दोघे जुळ्या बहिणी आपल्या विधवा आई बरोबर एकत्र राहतात. दोघेही मुली ह्या एका आयटी कंपनीत कामाला आहे.
एकेदिवशी आईसह दोघे बहिणी आजारी पडल्या. तिघांना टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या अतुल ने रुग्णालयात दाखल केले. रिंकी आणि पिंकी सह त्यांच्या आईला आणि योग्य सेवा देऊन त्यांना बरं केले आजारपणात मोठी मदत केली.घरात कोणी कर्त्या पुरुषांप्रमाणे मूळचा अकलूजचा रहिवाशी असलेल्या अतुलने आधार दिला.याच दरम्यान दोघा बहिनीपैकी एकीवर अतुलच प्रेम जुळलं, दुसऱ्या बहिणीला कळल्यावर बहिणी शिवाय जगू शकत नाही म्हणून आईच्या परवानगीने अतुलशी दोघा जुळ्या बहिणीचं लग्न करण्याचं ठरलं आणि 2 डिसेंबर ला लग्नही झालं.
राज्य महिला आयोगाने घेतली दाखल
या लग्नाची अकलूज पासून ते संपूर्ण राज्यात सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.माध्यमातही या लग्नाच्या बातम्या आल्या आहेत.यामुळे भारतीय दंडसंहिता नुसार 494 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तरी सोलापूर पोलिसांनी चौकशी करून कारवाही करावी आणि राज्य महिला आयोगाला अहवाल सादर करावा अस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.