Home > News Update > MPSC विद्यार्थ्यांचा अंत पाहु नका! अतुल लोंढे कडाडले

MPSC विद्यार्थ्यांचा अंत पाहु नका! अतुल लोंढे कडाडले

MPSC  विद्यार्थ्यांचा अंत पाहु नका! अतुल लोंढे कडाडले
X

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन देऊनही अद्याप नवीन अभ्यासक्रमाबाबत अधिसूचना जारी केलेली नाही. शिंदे फडणीस हे सरकार आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. पुण्यात तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू असतानाही राज्य सरकार गांभीर्याने घेत नाही. शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले, एमपीएससी अभ्यासक्रमातील बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी 2023 ऐवजी 2025 पासून करावी, ही विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तयारी करा. यासंदर्भात अनेक बैठका झाल्या, राज्य सरकारनेही एमपीएससीला तशा सूचना दिल्या, मात्र अद्यापही MPSC अधिसूचना जारी करत नसल्याने गोंधळ वाढला आहे.

एमपीएससी ही स्वायत्त संस्था असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणी खेळले तर त्याचे गंभीर परिणाम होतील. 2025 पासून अंमलबजावणी कोण रोखत आहे? झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? हे पहा आणि विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष द्या. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी पुण्यात आंदोलन केले होते आणि त्यावेळी त्यांना आश्वासन देखील देण्यात आले होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे बोलतात त्यावर विश्वास ठेवायचा असेल, तर सरकारच्या सूचनांचे पालन करण्यास आयोगाला कोण विरोध करत आहे? एमपीएससी ही स्वायत्त संस्था असल्याने शिंदे-फडणवीस सरकार जबाबदारी टाळू शकत नाही. सरकारने सर्व मार्गांचा पाठपुरावा करावा आणि MPSC ला त्वरित अधिसूचना जारी करण्यास भाग पाडले पाहिजे. बेमुदत उपोषणाला बसलेल्या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गुरुवारी बिघडल्याचे लोंढे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे काही झाले तर त्याला राज्य सरकार आणि एमपीएससी जबाबदार असेल, असे लोंढे वक्तव्य केले आहे.

Updated : 23 Feb 2023 5:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top