Home > News Update > Dombivli Building Collapse | डोंबिवलीत इमारत कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
Dombivli Building Collapse | डोंबिवलीत इमारत कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
कृष्णा कोलापटे | 15 Sept 2023 6:35 PM IST
X
X
डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली आहे. डोंबवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची इमारत कोसळली आहे. आदिनारायण सोसायटीची ही इमारत जुनी झाली होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना कालच दुसरीकडे स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर आज इमारत कोसळल्याची घटना घडलीय.
केडीएमसीच्या नोटीसनंतर काही कुटुंबानी सुरक्षितस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. तर अनेक कुटुंब अजूनही या इमारतीत वास्तव्यास होते. याशिवाय कल्याण डोंबिवलीत काल रात्री आणि आज सकाळीदेखील पाऊस सुरु होता. या दरम्यान ही इमारत कोसळली आहे. या घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
Updated : 15 Sept 2023 6:35 PM IST
Tags: Dombivli Building Collapse Many people are feared to be trapped under the debris dombivali kalyan diva KDMC
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire