Home > News Update > बुलडाण्यातील दिव्यांग बांधव 5 टक्के आरक्षित निधिपासून वंचित; जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

बुलडाण्यातील दिव्यांग बांधव 5 टक्के आरक्षित निधिपासून वंचित; जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

बुलडाण्यातील दिव्यांग बांधव 5 टक्के आरक्षित निधिपासून वंचित; जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
X

बुलडाणा : बूलडाणा नगरपरिषदेसह जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांकरीता स्थानिक स्वराज्य संस्थाना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ५ टक्के निधी राखीव ठेवून तो निधी त्यांच्या कामांवर खर्च करण्याचे शासनाचे सक्त निर्देश आहेत . मात्र , बुलडाणा जिल्ह्यातील नगर परिषद,नगर पंचायत व ग्राम पंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी मागील तीन वर्षापासूनचा निधी अद्याप दिव्यांग बांधवांना दिलेला नाही.तो निधी लवकर देण्याची मागणी तसेच अपंग निधीबाबतची माहिती देण्याची मागणी करण्यात आली.

8 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन पूर्ण जिल्ह्यातील तेराही तालूके व ग्रामिण भागात रखडलेले 5 टक्के निधीच्या प्रशासनवर चर्चा करण्यात आली. तेव्हा पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोन वर बोलून चार दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. मात्र पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या सूचनेकडेही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आज 16 नोव्हेनबर रोजी दिव्यांग बांधवांनी बुलडाणा नगर पालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडून तात्काळ निधी वाटप करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी कलीम शेख, आजम कुरेशी, सिराज टेलर, किशोर जाधव व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Updated : 16 Nov 2021 6:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top