Home > News Update > टीका होऊनही 'बायोबबल'मध्ये सुरू आहे आयपीएल मॅचेस

टीका होऊनही 'बायोबबल'मध्ये सुरू आहे आयपीएल मॅचेस

देशात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला असताना टीका होऊनही आयपीएल क्रिकेट सामने मात्र सुरू आहेत, मोठे आर्थिक व्यवहार असल्याने आयपीएल सामने सुरू ठेवणे क्रमप्राप्त असल्याचे सांगत खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी बायोबबलचा वापर केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टीका होऊनही बायोबबलमध्ये सुरू आहे आयपीएल मॅचेस
X

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, 'बायोबबल' हे असे वातावरण आहे ज्यामध्ये बाह्य जगात राहणाऱ्या लोकांचा कोणताही संपर्क राहत नाही, त्यात ठेवलेले लोक बाह्य जगापासून पूर्णपणे लांब राहतात. इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये सहभागी सर्व खेळाडू, प्रशिक्षक व सहाय्यक कर्मचारी, सामनाधिकारी, हॉटेल कर्मचाऱ्यांची रोज दोनदा कोरोना चाचणी केली जाते, त्यानंतर प्रत्येकाला बायो बबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाते.

एकदा आपण त्यात गेल्यावर कोरोना टेस्ट करणार्‍या वैद्यकीय टीमलाही बाहेर जाऊ दिले नाही. या मंडळामध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांची कोरोना चाचणी झाली आहे आणि ते संसर्गापासून पूर्णपणे दूर आहेत. या मंडळामध्ये राहणारे लोक बाह्य जगापासून दूर आहेत. म्हणजेच एक संलग्नक ज्यामध्ये येथे राहण्याची परवानगी मिळाल्यानंतर फक्त तेच लोक तिथे राहतात.

बायो-बबल कसा बनवला जातो?





आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचाऱ्यांची दुबईला जाण्यापूर्वी दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली होती. तत्पूर्वी नियमांनुसार प्रत्येकाला क्वारन्टीन ठेवले होते. या काळात, तीन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच प्रत्येकास बबलमध्ये समाविष्ट केले गेले.

बबलमध्ये समाविष्ट असलेल्यांना फक्त मैदान आणि हॉटेलमध्येच राहण्याची परवानगी आहे. केवळ बबलच्या आत असलेलेच त्यांना भेटू शकतात. स्पर्धेदरम्यान चाहत्यांना मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही. संघातील सदस्यांसाठी आणि सामना प्रसारित करणार्‍या उर्वरित कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र बबल तयार करण्यात आला आहे. स्पर्धा संपेपर्यंत बबलमधील सर्व लोकांना बाहेर जाऊ दिले जाणार नाही. विशेष परिस्थितीत, बाहेर जाणाऱ्यांना बबलकडे परत जाण्यापूर्वी त्यांना क्वारन्टीन ठेवणे आवश्यक आहे.

बायो-बबल तोडल्यास काय होईल?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) क्रिकेट बायो बबल नियम तोडेल तो आयपीएलची आचारसंहिता भंग केल्याबद्दल दोषी मानला जाईल आणि त्याअंतर्गत शिक्षा दिली जाईल. जर एखादा खेळाडू बायो-बबलच्या बाहेर गेला तर त्याला काही सामन्यांना बंदी घातली जाऊ शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा इशारा देतो की नियम मोडल्यास खेळाडूला कॉन्ट्रॅक्ट गमवावा लागू शकतो.

देशभरात मृत्यूचे तांडव सुरू असताना आयपीएल सुरू ठेवल्याबद्दल समाजाचा विविध क्षेत्रातून आणि परदेशी माध्यमातून टीका होत असताना आयपीएल आयोजकांनी आयपीएल सुरूच राहील अशी भूमिका घेतली आहे. आयपीएल म्हणजे जवळपास चार हजार कोटी रुपयांची उलाढाल कोणत्याही परिस्थितीत आर्थिक नुकसान होऊ द्यायचे नाही असे आयोजकांचे धोरण असल्यामुळेच आयपीएल सुरू असल्याची माहीती आयोजकांमधील सूत्रांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना दिली.

आज सकाळच्या आकडेवारीनुसार देशभरामध्ये एका दिवसामध्ये 3 लाख 86 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले असून जवळपास एका दिवसात तीन हजार 498 रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

देशात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या दोन लाख आठ हजार 330 इतकी झाली आहे.

दुसऱ्या लाटेमुळे करोना संसर्गाचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यात भर म्हणजे मृतांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे भीतीदायक दृश्य देशात निर्माण झालं आहे. रुग्णांसह नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहे. या विषयावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कान उघाडणी केली होती. केंद्राने राष्ट्रीय कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यावर सरकारनंही १०२ पानी प्रतिज्ञा पत्र दाखल करत भूमिका मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह हे देशातील ऑक्सिजन पुरवठ्यावर नजर ठेवून असल्याचं केंद्राने म्हटलं होतं. त्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. बैठकीत करोना संसर्गाचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच लस टंचाई दूर करण्यात संदर्भात काही निर्णय घेतला जाणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Updated : 30 April 2021 4:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top