Home > News Update > INDIA की भारत नावावरून पुन्हा वाद

INDIA की भारत नावावरून पुन्हा वाद

INDIA की भारत नावावरून पुन्हा वाद
X

सध्या देशाच्या राजकारणात I.N.D.I.A विरुध्द NDA असं चित्र पाहायला मिळत आहे. यावर वातावरण तापलंय. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत संपन्न झाल्यानंतर अनेकांनी इंडिया हा शब्द आपल्या निवेदनातून आणि बोलण्यातू्न टाळण्याची सुरूवात केली आहे. केंद्र सरकारच्या G २० परिषदेतून हा शब्द वगळण्यात आल्याने केंद्र सरकारवर पुन्हा एकदा विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने ट्विट करत माहिती दिली आहे की, "G - २० संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इतर देशांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत रिपब्लिक ऑफ भारत असा उल्लेख केलाय. याआधी रिपब्लिक ऑफ इंडिया असा शब्दप्रयोग केला जात होता. यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय.

दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भूमिका स्पष्ट केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट केलं आहे. सत्ताधा-यांच्या मनात इतकी अस्वस्थता निर्माण झाली आहे की, त्यांच्याकडून आता INDIA या शब्दाचा वापरही टाळला जात आहे. जे INDIA या शब्दाला स्वीकारू शकत नाहीत, ते देशवासियांना काय स्वीकारणार... INDIA हा विश्वास आहे. प्रत्येक भारतीयाचा, ही ताकद आहे प्रत्येक भारतीयाची, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसनं ट्विट केलंय.


Updated : 5 Sept 2023 4:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top