Home > News Update > राणे पिता-पुत्र पुन्हा अडचणीत,दिशा सालियन बाबत केलेल्या वक्तव्यावरुण गुन्हा दाखल

राणे पिता-पुत्र पुन्हा अडचणीत,दिशा सालियन बाबत केलेल्या वक्तव्यावरुण गुन्हा दाखल

राणे पिता-पुत्र पुन्हा अडचणीत,दिशा सालियन बाबत केलेल्या वक्तव्यावरुण गुन्हा दाखल
X

सुशांत सिंह राजपुत याची मॅनेजर दिशा सॅलियन हिचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर तिचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता.याप्रकरणी राणेंकडुन दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता.आता दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली असून मालवणी पोलिस ठाण्यात पोलिस गुन्हा दाखल केला आहे.

दिशा सालियनवर बलात्कार करुन तिची हत्या झाली.ती गरोदर होती.असा दावा नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.त्यावर सालियन कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला होता.राणेंमुळे आपल्या मुलीची बदनामी होत आहे.तिची बदनामी करणं थांबवाव,असं आवाहन सालियन कुटुंबीयांनी पोलिसांत राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला अहवाल सोपवला होता.तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसुन ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन दिली आहे.


मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सॅलियन व वडील सतीश सॅलियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांनी तिच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी दिशाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Updated : 27 Feb 2022 12:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top