Home > News Update > सुभाष चंद्रावर कर्ज संकट, डीश टीव्हीचे शेअर गहाण

सुभाष चंद्रावर कर्ज संकट, डीश टीव्हीचे शेअर गहाण

सुभाष चंद्रावर कर्ज संकट, डीश टीव्हीचे शेअर गहाण
X

सुभाष चंद्रा टीव्ही क्षेत्रातील मोठं नाव. मात्र, हेच सुभाष चंद्रा आता आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांनी आता आर्थिक अडचणीवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

सुभाष चंद्रा हे एस्सेल समूहाचे अध्यक्ष आणि झी एंटरटेनमेंटचे संस्थापक आहे. त्यांनी घेतलेलं कर्ज परत न करू शकल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. अशातच चंद्रा यांच्यासाठी डीश टीव्हीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या जवाहर गोयल यांनी डीश टीव्हीचे शेअर गहाण ठेवल्याचं समजतंय.

या संदर्भात झी इंटरटेनमेंटने माहिती दिली असून यामध्ये सुभाष चंद्रा यांच्या समुहाचा पत पुरवठा सुरळीत होण्यासाठी डीश टीव्हीचे शेअर गहाण ठेवले असल्याचं म्हटलं आहे.

डीटूएच सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी डीश टीव्ही एक प्रमुख कंपनी आहे. त्यामुळे भविष्यात जर सुभाष चंद्रा यांनी कर्ज फेड परत केली नाही. तर तर डीश टीव्हीवरील गोयल यांचे नियंत्रण संपुष्टात येऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून कंपनीवर आर्थिक संकट असल्याची चर्चा सुरु असताना कंपनीने निवेदन जारी करुन ही माहिती दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र टाईम्स वृत्त दिलं आहे.

Updated : 25 April 2021 8:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top