Home > News Update > ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या कर सवलतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या कर सवलतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या कर सवलतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा
X

‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी दिले

'सत्यशोधक ' हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिल्या.

या चित्रपटावर आकारण्यात येणाऱ्या 18 टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी 9 टक्के GST रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या एकूण रकमेची करसवलत चित्रपटाला देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्याने चित्रपटाला करसवलत दिली पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. या बैठकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वित्त, महसूल व सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Updated : 9 Jan 2024 10:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top