गुजरातला ३० लाख तर महाराष्ट्राला ७.५ लाख लसी का? संयमी राजेश टोपे केंद्र सरकारवर संतापले
आपल्या शांत संयमी स्वभावाने महाराष्ट्राला परिचित असणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे केंद्रसरकारवर का संतापले? वाचा
X
आपल्या शांत, संयमी स्वभावाने महाराष्ट्राला परिचित असणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आज केंद्रावर चांगलेच संतापले. "महाराष्ट्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त ७.५ लाख लसी का?" असा सवाल टोपे यानी केंद्राला केला आहे. आज टोपे यांनी आकडेवारी मांडत केंद्राला खडेबोल सुनावले आहेत. ''ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत" ही आकडेवारी सांगत केंद्र सरकार महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्राला कशी सापत्न वागणूक देत आहे.
याची माहितीच टोपे यांनी माध्यमांना दिली आहे.केंद्र सरकारशी भांडायचं नाही…आम्हाला केंद्र सरकारशी भांडायचे नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्यही करत आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला असणारी ४० लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्राकडे जवळपास९ लाख लसी आहेत. हा साठा दीड दिवस पुरेल. केंद्र सरकारने नव्याने 17 लाख लसी दिल्या असल्या तरी आठवड्याला ४० लाख या मागणीच्या तुलनेत हा साठा अपुरा आहे.
डॉ. हर्षवर्धन यांच्या आरोपांना उत्तर "राज्याची कामगिरी नीट नाही म्हणून कोरोनाची अशी स्थिती आहे निरीक्षण चूक आहे. राज्यात फक्त दीड दिवसांना पुरेल इतकी लस उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचं कौतुक WHO, वॉशिंग्टन पोस्टसकट अनेक आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी केलं आहे. महाराष्ट्रापेक्षा दिल्ली, गोवा आणि पुदुचेरीचा डेथ रेट जास्त आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या बाबतीत पारदर्शक धोरण आहे. असं म्हणत टोपे यांनी केंद्राच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीवरून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असून केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा मिळत नसल्याचं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग असल्याचा आरोप केला होता.काय म्हटलं होतं डॉ. हर्षवर्धन यांनी?
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त झालेला असताना महाराष्ट्र सरकार फक्त वसुलीमध्ये व्यस्त आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे .महाराष्ट्र सरकारने तर कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली. केंद्र सरकारने सातत्याने महाराष्ट्र सरकारला सल्ले दिले. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. असं म्हणत कोरोना लसीचा तुटवडा असल्याचा आरोपही निराधार असून राज्यातील काही नेते लसीचा तुटवडा असल्याचे सांगून राज्य सरकारचे कोरोना संसर्ग रोखण्यातील अपयश लपवत असल्याचाही आरोप हर्षवर्धन यांनी केला होता.महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग
महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या घालून महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग आहे, असा आरोपीह हर्षवर्धन यांनी केला आहे.भाजपशासित राज्यांचा विषय एका ओळीत संपवला
एकीकड़े महाराष्ट्रातील सरकारवर टीका करताना हर्षवर्धन यांनी भाजपशासित राज्यांमधील परिस्थितीचा ओझरता उल्लेख करत त्यांचा विषय एका वाक्यात संपवला आहे. कर्नाटक, गुजरात, राजस्थान या राज्यांनीही आपल्या आरोग्य व्यवस्था दर्जेदार कऱण्याचा सल्लाही दिला आहे.