Home > News Update > हिरडपुरी उच्च पातळी बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

हिरडपुरी उच्च पातळी बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

हिरडपुरी उच्च पातळी बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू
X

जालना : जालना जिल्ह्यातील व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर गोदावरी नदीवरील असणारा हिरडपुरी उच्च पातळी बंधारा पूर्ण क्षमतेने धरला आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या दोन दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा विसर्ग वाढण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.

हिरडपुरी उच्च पातळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बंधाऱ्यात पाण्याची आवक सुरू असल्याने बंधाऱ्याचे आणखी दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येऊ शकतात.

त्यामुळे हिरपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे.

Updated : 31 Aug 2021 1:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top