महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनाल हंगामीवर ; २५ वैद्यकीय महाविद्यालयात ७३ जागा रिक्त
X
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा अट्टहास पूर्ण करू पाहणारे सरकार गेल्या 4 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला गेल्या पाच वर्षांत पूर्णवेळ वैद्यकीय शिक्षण संचालक देऊ शकलेले नाही. त्यामुळे जवळपास 4 वर्षे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचा कारभार हंगामी तत्त्वावर सुरू आहे. तसेचं राज्यातीलील विविध वैद्यकीय पद रिक्त आहेत. महाराष्ट्र मेडीकल कॉन्सीलमध्ये देखील निवडणूक झाली नसून ते ही पद रिक्त आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेचा हा परिणाम असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे.
दरम्यान डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की "महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे प्रमुख हे पद गेले ४ वर्ष रिक्त या पदावर हंगामी नियुक्ती केली जातेय. २५ वैद्यकीय महाविद्यालयात ७३ जागा रिक्त असल्याचं त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागातील विभाग प्रमुख, प्रोफेसर अशी इतर पद रिक्त असूनसरकारी दवाखान्यात डॉक्टर, कर्मचाऱ्यां पूरेशी उपलब्धता नाही. उपचारासाठी सर्वसामान्य मध्यम वर्गीय लोकं या रुग्णालयात येत असातत त्यांना उपचारादरम्यान झळ सोसावी लागत आहे. यामागे राज्यातील राजकीय अस्थिरतेचा हा परिणाम असल्याचं डॉ. भोंडवे यांनी सांगितले.