'कांजूर'साठी महाविकास आघाडीचा नवा डाव: कारशेड साठी टाकले 43.7 हेक्टर जागा राखीव करण्याचे आरक्षण
भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीच्या राजकीय साठमारीत अडकलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी सरकारने धाडसी पाऊल उचलून कांजूरच्या वादग्रस्त 43.7 हेक्टर जागेवर नगर विकास खात्याकडून अधिसूचना काढून मेट्रो कारशेडचे आरक्षण जारी केले आहे.
X
मुंबई - मेट्रो 3, (कुलाबा-वांद्रे-सिपझ) आणि मेट्रो 6(लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजुरमार्ग) कारशेड कांजुरमार्ग येथील प्रस्तावित जागेवरच उभारण्याचे अखेर राज्य सरकारने निश्चित केले आहे. कांजूरला कारशेड करणे भविष्यासाठी हिताचे ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषेद सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायालयात जनेतला न्याय मिळेल. तीन लाईनची प्रस्तावित जागेवर कार शेड मिळेल. कोणतेही काम फुकट जाणार नाही. बदलापूरमधील नागरिकांनाही शहरात येता येणार आहे. ही कारशेड पुढील ५० ते १०० वर्षांसाठी फायद्याचे ठरणार आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
काल नगर विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये विकास आराखड्यात बदल करत कांजुर मार्ग येथील 43.76 हेक्टर जागा मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्यात आली आहे. त्यानुसार या जागेचा वापर कारशेड, कास्टिंग यार्ड आणि मेट्रोच्या इतर कामासाठी गेला जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
मेट्रो 3 कारशेड आरेत तयार करण्यास विरोध झाल्याने महाविकास आघाडी सरकारने मेट्रो 6 चे कारशेड हे कांजुर मार्गाच्या जागेवर हलवल्यानंतर भाजपने जोरदार विरोध केला होता.
The diplomaticत्याचवेळी या जागेवर केंद्र सरकारने आणि खासगी बांधकाम विकासकाने मालकी असल्याचा दावा केला. हे प्रकरण न्यायालयात असून यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीनेही कांजुरमार्गच्या जागेला पसंती दिल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकरणी अजून न्यायालयाकडून अंतिम निर्णय येणे बाकी आहे. मात्र तरीही सरकारची ही अधिसूचना कारशेडच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. एमएमआरडीएचे आरए राजीव यांना मुदतवाढ आणि उच्च न्यायालयात नव्याने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हवे तर पैसे देऊ पण मेट्रो सेरियल जागेवरून झाले पाहिजे अशी भूमिका महा विकास आघाडी सरकारने घेतली आहे. कांजूरच्या जागेवर टाकलेले आरक्षण हे सरकारच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं जात आहे.

