2 डोस 3 सर्टिफिकेट, 100 कोटी लसीकरणाचा दावा जुमला आहे का?
2 डोस 3 सर्टिफिकेट, 100 कोटी लसीकरणाचा दावा जुमला आहे का?
X
देशात 100 कोटी लसीकरणाचे ढोल वाजवले जात आहेत. मात्र, या 100 कोटी लसीकरणाबाबत आता काही शंका उपस्थित केल्या जात आहे. ज्या लोकांनी लस घेतली नाही. ते लोकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळत असल्याने 100 कोटी लसीकरण हा जुमला आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
धुळे जिल्ह्यातील दिनेश मोरे यांनी पहिला डोस 1 एप्रिल २०२१ ला घेतला होता. तर दुसरा डोस 23 जून 2021 ला घेतला. मात्र, त्यांना 2 ऑक्टोबर ला डोस देण्यात आला आहे. ऑक्टोबरला डोस घेतल्याचा मेसेज आलेल्या दिनेश मोरे यांच्याशी आम्ही बातचीत केली. यावेळी त्यांनी 100 कोटी लसीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे का? असा सवाल उपस्थित करत अशा प्रकारे जर चुकीचे प्रमाणपत्र दिले जात असतील तर यामुळे गरजू लोक वंचित राहण्याची भीती आहे. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पाहा काय म्हटलंय दिनेश मोरे यांनी