कोरोना चाचणी न करता माजी मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर मेसेज…
X
कोरोना चाचणी केली नसतानाही माजी मुख्यमंत्र्यांचा कोरोनाचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंग यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
ते म्हणतात मी आज आज कोरोना टेस्ट करणार आहे. मात्र नमुना देण्यापूर्वीच त्यांना एक संदेश आला की तुमचा नमुना प्राप्त झाला आहे.
दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं आहें..
हे काय चालू आहे. १०:२ वाजले आहेत. मी अद्याप माझा RTPCR चाचणी साठी सॅम्पलं दिलेलं नाही. मात्र, तरीदेखील मला असा संदेश प्राप्त झाला आहे.
९:३९ वाजता कोणाचा नमुना घेतला गेला आणि आरएमएलला पाठविला गेला ? मला माहित नाही, काय चालले आहे, मला कोणी सांगेल का?
थोड्या वेळाने दिग्विजय सिंह यांनी आणखी एक ट्विट करत म्हटलं आहे की…
'आरएमएलचे कर्मचारी आले आणि त्यांनी सकाळी १०::३५ वाजता माझा नमुना घेतला. याची व्यवस्था करण्यासाठी आरोग्य मंत्री के .एस. सदानंदजी यांचे आभार, पण नमुना गोळा होण्यापूर्वी त्या व्यक्तीला संदेश पाठविला जाऊ नये, गोंधळ टाळण्यासाठी नमुना गोळा झाल्यानंतर संदेश पाठवावा.
या ट्विटनंतर थोड्याच वेळात दिग्विजय सिंह यांनी आणखी एक ट्विट केले आणि म्हणाले…
आता हा विषय संपला आहे, म्हणून मी माझे जुने ट्विट डिलीट करतो.'
दिग्विजय सिंह यांचा शिवराज सरकारला सल्ला
दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे लोकांना कोरोनापासून सतर्क राहण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, 'ज्या कोणाला खोकला, सर्दी, ताप येत असेल त्यांनी त्वरित घरामध्ये
स्वतःला आइसोलेट करावं आणि RT-PCR टेस्ट करून घ्यावी. जिल्हा प्रशासनाच्या व्हीसीऐवजी, अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच जिल्हा व मंत्रालयात 24 तासांची हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात यावी. असा सल्ला दिग्विजय सिंह यांनी दिला आहे.
मध्य प्रदेश सरकारला सल्ला देताना दिग्विजय सिंह म्हणाले होते की -
शिवराजजी, तथ्य लपविण्याऐवजी समस्या सोडवण्याकडे लक्ष द्या, कोविड रूग्णांसाठी बेड वाढवा, पुरेसे ऑक्सिजन द्या, रेमेडिसीवर इंजेक्शनची व्यवस्था करा, काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांना शिक्षा द्या, पीएचसी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआर कीट पुरवा.