हरिसाल बलात्काराचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत
हाथरस पाठोपाठ महाराष्ट्रात हरिसाल बलात्काराचे पडसाद वाढत असूनपोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये धारणी दलित महिला बलात्काराच प्रकरण मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करणार असे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी जाहीर केले आहे.
X
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील हरिसाल येथील दलित महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी घेतली आहे.या प्रकरणात अमरावती चे पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती त्यांनी घेतली व कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांना दिल्या. तसेच हे प्रकरण आपण मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करणार असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितल आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तब्बल सहा दिवसानंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट व सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मेळघाट मधील हरिसाल या गावात एका महिलेसोबत दोन युवकांनी दारु पिऊन बलात्कार केला.या प्रकरणात पोलिसांनी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला नव्हता. त्या घटनेनंतर सदर पीडित महिला बेपत्ता होती. " ही पीडित महिला बेपत्ता झाल्याने ती दलित असल्याची माहिती आम्हाला मिळाली नाही. त्यामुळं आम्ही तेव्हा अट्रोसिटी दाखल केली नव्हती. दोन दिवसांपूर्वी ही महिला खंडवा येथे असल्याचे कळल्यावर तिला अमरावतीत आणण्यात आले. आणि अट्रोसिटी ही दाखल करण्यात आलीय. आरोपींना तर त्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे," असे पोलीस अधीक्षक हरिबाला यांनी मंत्री डॉ. राऊत यांना सांगितले
सदर महिला खंडव्याला गेली आणि तिने दुसरं लग्न केलं. तिला एक मुलगी आहे, ती मुलगी कल्याण ला नोकरीनिमित्त गेली आहे, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. " सदर प्रकरण मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करणार आहे. या प्रकरणी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल असे कलम लावा, अशी सूचना मी एसपीना केली," असे डॉ.राऊत म्हणाले.