Home > News Update > धनंजय मुंडे प्रकरण: अजित पवार यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका...

धनंजय मुंडे प्रकरण: अजित पवार यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका...

धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करणाऱ्या चित्रा वाघ यांचं नाव न घेता अजित पवार यांनी खरपूस शब्दात समाचार घेत चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे. वाचा काय म्हटलंय अजित पवार यांनी...

धनंजय मुंडे प्रकरण: अजित पवार यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका...
X

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. भाजपने मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यासाठी आंदोलन केले होते. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केले होते. पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील. असं म्हणत चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली होती.


धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचं वादळ शमल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या चित्रा वाघ यांचं नाव न घेता खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांच्या कुटुंबाची आणि पक्षाची बदनामी झाली. असं म्हणत अजित पवार यांनी मुंडे विरोधात तक्रार मागे घेतली मात्र, बदनामी झाली त्याचं काय? मुंडे विरोधात रान उठवून त्यांच्या अनेक वर्ष केलेल्या कामाचं मातीमोल केलं अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अलिकडच्या काळात अशा प्रकारे ज्या घटना घडत आहेत. त्या समाजासाठी मारक आहेत. जरूर काही महिलांवर अन्याय होत असतील, ते अन्याय अजिबात होता कामा नये. महिलांकडे आपण बहिणीच्या नात्याने, आईच्या नात्याने, पत्नीच्या नात्याने त्या ठिकाणी पाहत असतो. असं असताना या बाबतीत जे काही घडतं. हे खूपच क्लेशदायक आहे.

असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांच्यावर टीका...

या सर्व प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावर बोलताना

यांनी मोर्चे काढले, सर्व गोष्टी केल्या. विरोधकांचं कामच असतं. सत्ताधारी पक्षाची एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये त्यांची बदनामी होऊ पाहते. त्यावेळी ते आवाज उठवण्याचं काम करणार. सरकारच्या मधील काही सहकारी कसे अयोग्य वागतात. हे दाखवण्याचं काम करणार, तशा पद्धतीने त्यांनी केलंय. आता ती त्यांना एका प्रकारची चपराक आहे. कारण ज्यांच्या बद्दल ते मोर्चे काढत होते. ज्यांच्यावर अन्याय झाला म्हणून जे काही बोलत होते. त्यांनीच आता केस मागे घेतली आहे. आता त्याच्यावर चंद्रकांत दादांनी सांगितलं पाहिजे. किंवा ज्या महिलांनी मोर्चे काढले. त्यांनी सांगितले पाहिजे. काही काही गोष्टीची घाई करून चालत नाही. त्याच्या संदर्भातील सर्व पार्श्वभूमी समजून घेऊन आताताईपणा दाखवून चालत नसतं. खरं काय उगीचच आपण ते करत असताना कोणावर अन्याय होणार नाही. याची पण काळजी आंदोलन करणाऱ्यांनी घ्यायची असते.

चित्रा वाघ यांचं नाव न घेता इशारा

परंतू अलिकडे झटपट आपलं नाव व्हावं. आम्ही पक्षासाठी काहीतरी करून दाखवतोय. आणि जी बाडगी असतात ना... जी या पक्षातून त्या पक्षात जातात. ते तर पहिले त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आम्ही किती या पक्षात येऊन पक्षाशी समरस झालो आहोत. पक्षामध्ये एकरूप झालो आहोत. हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. वास्तविक कोणाच्या काय काय गोष्टी आहेत. सांगायच्या ठरल्या तर वेळ अपुरा पडेल. असं म्हणत अजित पवार यांनी चित्रा वाघ यांना इशारा देखील दिला.

Updated : 23 Jan 2021 12:12 PM IST
Next Story
Share it
Top