Home > Max Political > 'अपूर्ण कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर' ; धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना टोला

'अपूर्ण कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर' ; धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना टोला

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. त्या पालकमंत्री होत्या, त्यांच्या काळात विकास कामे झालीच नाहीत, जी झाली ती अर्धवट कामे आहेत.ती कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आल्याची टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचे नाव न घेता केली.

अपूर्ण कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर ; धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना टोला
X

बीड // राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. त्या पालकमंत्री होत्या, त्यांच्या काळात विकास कामे झालीच नाहीत, जी झाली ती अर्धवट कामे आहेत.ती कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आल्याची टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचे नाव न घेता केली. पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या अनावरण प्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते.

पालकमंत्री असताना त्यांनी अनेक विकास कामे अर्धवट सोडली. त्या विकास कामावर कळस चढवण्याची संधी जनतेने आम्हाला द्यावी असं धनंजय मुंडे म्हणालेत. रेल्वेच्या रखडलेल्या कामाच्या मुद्द्यावरून त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. अनेक दिवसांपासून रेल्वेचे काम रखडले होते. मात्र, आता रेल्वेच्या कामासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला. येत्या काही दिवसांतच या मार्गावरून सुपर फास्ट ट्रेन धावेल असं त्यांनी म्हटले आहे. येत्या 29 डिसेंबरला अहमदनगर बीड रेल्वेची चाचणी होणार आहे. सोलापूवाडी येथे रेल्वे जंक्शनचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रेल्वेमुळे बीड येथील नागरिकांना फायदा होणार असून विकासाला गती मिळणार आहे.

Updated : 26 Dec 2021 9:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top