Home > News Update > देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातील वाहनाने दुचाकीस्वारास उडविले

देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातील वाहनाने दुचाकीस्वारास उडविले

नांदेड दौऱ्यावर असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दोन दुचाकीस्वारास उडविल्याची घटना मुखेड रस्त्यावर घडली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातील वाहनाने दुचाकीस्वारास  उडविले
X

नांदेड दौऱ्यावर असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दोन दुचाकीस्वारास उडविल्याची घटना मुखेड रस्त्यावर घडली आहे.

गडगा ते मुखेड मार्गावर आज ही घटना घडली , या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत . या दौऱ्यातील एम एच 26 बी सी 8 या वाहनात फडणवीस यांच्या दौऱ्यासाठी मुंबईहून आलेले पत्रकार बसले होते. फडणवीस दौऱ्याच्यावेळी ताफ्यातील वाहनांच्या मागे सुसाट धावत असलेले वाहन मुखेड रस्त्यावर बेरळी येथील छत्रपती अकॅडमीजवळ दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात बालाजी पवार, राजेश जाधव, पोलीस कर्मचारी नामदेव दोसलवार हे तिघेजण जखमी झाले आहेत , जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती व शेतीची नुकसान पाहणी करण्यासाठी आल्याचे माध्यमांना कळविण्यात आले खरे पण देवेंद्र फडणवीस नायगाव तालुक्यातील नरसी येथे पोहचल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांची देगलूर विधानसभेची उमेदवारी भाजपाकडून जाहीर करण्यात आली , या निर्णयामुळे फडणवीसांनी साबणे यांना एक प्रकारची लिफ्ट दिल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.

Updated : 3 Oct 2021 6:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top