बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळ्याचं फडणवीसांना निमंत्रण नाही?
X
आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा मुंबईत पार पडणार आहे. या सोहळ्याला राज्यातील सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहे. मात्र, ज्या फडणवीस सरकारच्या काळात या स्मारकाची घोषणा करण्यात आली. त्या फडणवीसांनाच या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याचं निमंत्रण पत्रिकेवरून स्पष्ट झालं आहे.
निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडीच्याच नेत्यांचीच नावं आहेत. विशेष बाब म्हणजे फडणवीस सरकारच्या काळात स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती.
त्यामुळं फडणवीस यांना या स्मारकाच्या भूमिपुजन सोहळ्याला बोलावण्यात येईल. असे कयास लावले जात होते. मात्र, फडणवीस यांना निमंत्रण न दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी होणार आहे. मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. या स्मारकाचा पहिला टप्पा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.