देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 11 March 2021 11:46 AM IST
X
X
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कात्रीत पकडणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशन संपताच सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे.
अधिवेशन संपताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील नागपूरला रवाना झाले. आणि आज त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. एरवी मोहन भागवत अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता आणि प्रदेशाध्यक्ष यांची एकत्रित भेट घेत नाही. त्यामुळं अधिवेशन संपताच अशा प्रकारे भेट झाल्यानं या चर्चेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालं आहे. साधारण अर्धा तास चाललेल्या या चर्चेत नक्की काय बातचीत झाली? हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही.
Updated : 11 March 2021 11:47 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire