Home > Max Political > फडणवीस जी खुश तो बहुत होंगे?

फडणवीस जी खुश तो बहुत होंगे?

फडणवीस जी खुश तो बहुत होंगे?
X

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील नाराजीचं कारण देत एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करीत अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घातलं. खडसे यांचा महाराष्ट्रात भाजपाची पाळमूळं रोवण्यात मोलाचा वाटा आहे.

'शेटजी भटजीचा पक्ष' अशी ओळख असलेल्या भाजपला खडसे मुंडेंनी बहुजनांचा जनाधार मिळवून दिला. 6 वर्षांपूर्वी राज्यात पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली. आणि नाथा भाऊंनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली. देवेंद्र फडणवीस यांच्या रुपानं तरुण तडपदार, अभ्यासू मुख्यमंत्री महाष्ट्राला मिळाला.

मात्र, मुंडे -गडकरी गटातील अनेक नेत्यांचा पत्ता कट झाला... त्यातील काही नेत्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला. यातील काही नेत्यांनी फडणवीसांशी जुळवून घेतलं... ज्यांनी -ज्यांनी फडणवीसांशी जुळवून घेतलं नाही. त्यांचे पद्धतशीरपणे पंख छाटण्याचं काम फडणवीसांनी केलं असं अनेक राजकीय विश्लेषकांच मत आहे.

फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर दावा सांगतील असे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे या नेत्यांचा पद्धतशीरपणे कार्यक्रम करण्यात आला. स्वपक्षातील राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची वर नजर ठेवणाऱ्या सर्व नेत्यांचा विधानसभेचा मार्गच बंद करण्याचं ठरवलं.

त्याप्रमाणे एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेलाच तिकिट नाकारण्यात आलं आणि पंकजा मुंडे यांचा अमित शाह यांनी सभा घेऊनही पराभव झाला. फडणवीस यांच्या पक्षातील राजकीय स्पर्धक पंकजा मुंडे पराभूत झाल्या, हा खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक लाभकारक क्षणच होता. खडसे. तावडे आणि पंकजा मुंडे यांचा विधानसभेतील प्रवेश रोखण्यात या तीनही नेत्यांच्या राजकीय स्पर्धकांना यश आले. मात्र, खडसे फडणवीसांवर घायाळ झालेल्या वाघाप्रमाणे तुटून पडत होते.

आत्ताच विधान परिषद निवडणुकीला तावडे, खडसे आणि पंकजा मुंडे या तिघांनाही तिकिट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पंकजा मुंडे आणि तावडे यांना स्थान देण्यात आलं. मात्र, यात खडसेंना स्थान देण्यात आलं नाही. या सगळ्या घडामोडी पाहता खडसेंना कळून चुकलं होतं की ज्या पक्षासाठी जीवाच रान केलं. त्या पक्षात राहण्यात अर्थ नाही. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देणं योग्य ठरेल. आणि तसंच खडसेंनी भाजपला रामराम ठोकला. मात्र, खडसेंना पक्षाबाहेर काढण्यासाठी कोणी प्रयत्न केले? असा प्रश्न निर्माण होतो.

एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप...

खडसेंच्या जावयानं लिमोझिन कार बेकायदेशीररित्या मॉडिफाय केल्याचा आरोप

दाउदच्या लिस्ट मध्ये खडसेंचं नाव असल्याचा आरोप

बेकायदेशीररित्या भूखंड खरेदीचा आरोप...

पुण्याच्या भोसरी एमआडीसीतील 3 एकरचा भूखंड खडसे यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी केला.

कथित पीए गजानन पाटीलनं खडसेंच्या नावे 30 कोटींची लाच मागितल्याचा आरोप

अशा आरोपांची खडसे यांच्यावर राळ उठवण्यात आली. त्यामुळे खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, या आरोपांचं पुढं काय झालं? हे अद्यापर्यंत समोर आलं नाही. मात्र, खडसे यांना पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी लागली. या सोडचिठ्ठी मागे जे होते... ते खडसेंच्या सोडचिठ्ठी आनंदीत तर झालेच असतील ना?

एकनाथ खडसे राजकीय प्रवास

1988: कोथळी गावचे सरपंच

1990: मुक्ताईनगर मतदार संघातून विधानसभेवर

1997: भाजप-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री

2010: एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते

2014: फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री

2016: भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महसूल मंत्रिपदाचा राजीनामा

2020: देवेंद्र फ़डणवीस यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर राजीनामा

Updated : 1 Nov 2020 9:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top