मराठा समाजाला फडणवीस सरकारने आरक्षण दिले - नरेंद्र पाटील
मराठा समाजाचा लढा 1980 पासून सुरू असून 42 मराठा बांधवांनी बलिदान दिल्यानंतर फडणवीस सरकारने आरक्षण दिले असल्याचं वक्तव्य आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलं आहे.
X
आताच्या आघाडी सरकारने आरक्षणात सवलती कशा वाढवता येतील कश्या चांगल्या योजना येतील हे पाहायाला पाहिजे होत.पण आम्हाला सवलती मिळण्यापेक्षा आमच्याच आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्टे ऑर्डर दिलीय हे आमचं दुर्भाग्य असल्याची मत पाटील यांनी व्यक्त केलय. स्ट ऑर्डर मुळे मराठ्यांना विद्यार्थ्यांना त्याच बरोबर नोकरीमध्ये हे आरक्षण आता नाकारलेले गेले असून एकंदरीत मराठा समाँजाची वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली असल्याची खंतच पाटील यांनी व्यक्त केलीय.
विनायक मेटे, छत्रपती संभाजी राजे भोसले, उदयन राजे भोसले, असतील अनेक मराठा समाजाच्या वेगवेळ्या संघटना एकत्र आल्या पाहिजे आणि एसी.बी.सी मधून असलेले आरक्षण मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे हा एकच मुद्दा राज्यसरकारकडे मांडला पाहिजे. अस परखड मत आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलंय.