नाशिक ऑक्सिजन गळती: अशा घटना पुन्हा घडू नये: देवेंद्र फडणवीस
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 April 2021 5:23 PM IST
X
X
नाशिक येथे ऑक्सिजन गळती झाल्यानं 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले...
प्रशासनाने आता तात्काळ गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी तर होईलच. पण भविष्यात अन्यत्र कुठे अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे.
नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.
असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Updated : 21 April 2021 5:23 PM IST
Tags: Devendra Fadnavis Nashik Oxygen Tank Leakage
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire