.... या महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलेलं आहे- देवेंद्र फडणवीस
X
आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.या परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर आसूड ओढले.भोंग्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपाने बहिष्कार का टाकला,याचे कारण सांगितलं आहे.
सर्वपक्षीय बैठकीवर भाजपाचा बहिष्कार
आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. परंतु ज्या काही घटना मागील चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय असं आम्हाला वाटत नाही. जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशाप्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.
विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायचं अशाप्रकारची प्रवृत्ती जर सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलिस संरक्षणात आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यासाठी पोलिसांच्या समक्ष हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही त्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल,तर मग अशा बैठकीत जाऊन फायदा काय़ असं फडणवीस यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच बघितली नाही.
महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच बघितली नाही की सरकार पक्षाचे लोक, पोलिस संरक्षणात विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करत आहेत.आम्ही पोलखोल यात्रा काढली,या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील सगळा भ्रष्टाचार आम्ही जनते समोर
मांडला.लोकशाहीत यापेक्षा वेगळं काय करायचं असतं,पण ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला.आमच्या पोलखोल रथावर हल्ला केला आणि त्यांना असं वाटतय की अशाप्रकारचे हल्ले करुन आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं बंद करु, हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई सुरुच राहील.असं फडणवीस महाविकास आघाडी सराकरला म्हणाले.
हे सरकार महाराष्ट्राला लज्जा आणणारं आहे.
हनुमान चालिसा म्हंटल्यावर जर राजद्रोह होत असेल तर आम्ही रोज म्हणू,आमच्यावरही राजद्रोहचा लावा,यावेळी फडणवीसांनी हनुमान चालिसा म्हणून दाखवली.आमच्यापैकी प्रत्येकजण राजद्रोह करण्याकरीता तयार आहे.हे सरकार महाराष्ट्राला लज्जा आणणारं आहे.नवनीत राणा यांना जेलमध्ये हीन वागणूक मिळाली.पिण्याचं पाणि दिलं नाही. बाथरुमला जाऊ दिलं नाही.
या महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलेलं आहे.
लोकशाहीबद्दल ओरडणारे कुठे आहेत.एका महिलेला हनुमान चालिसा म्हटल्यामुळे १२४ अ खाली अटक करण्यात येत असेल,जेल मध्ये हीन वागणूक मिळत
असेल,आणि ती दलित आहे याची जाणिव करुन दिली जात असेल,तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलेलं आहे.असा घणाघात त्यांनी पत्रकार परिषदेत केला.