सचिन वाझेंचे सरकारमधील सूत्रधार कोण ?- देवेंद्र फडणवीस
X
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर यांच्यावर कारवाई करुन सरकार हे प्रकरण दाबू शकत नाही, पण सचिन वाझेच्या सरकारमधील सूत्रधाऱांना शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना उद्धव ठाकरे यांनी स्वत: आपल्याला फोन करुन सचिन वाझेंना सेवेत घेण्याची विनंती केली होती. तसेच शिवसेनेचे काही मंत्रीसुद्धा आपल्याकडे यासाठी आले होते, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. पण आपला कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर वाझे यांना सेवेत घेता येणार नाही हे स्पष्ट करण्यात आले होते, असेही फडणवीस यांना सांगितले.
मुंबईमध्ये सट्ट्याचे जे रॅकेट आहे त्यांच्याशी सचिन वाझे किंवा त्यांच्या लोकांचा संपर्क होता, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.