नामकरणापेक्षा त्या शहरांचा विकास होणं गरजेचं: आरोग्यमंत्री राजेश टोपे
X
नामकरणापेक्षा त्या शहरांचा विकास होणं गरजेचं. काल झालेल्या दिवसभरात झालेल्या लसीकरणात कुणालाही काहीही त्रास झालेला नाही. लस अत्यंत सुरक्षित आहे. केंद्राकडून साडेसात लाख कमी आलेले लसीचे डोस पुन्हा देण्याचे मान्य केलं असल्याचे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
मागील काही दिवसांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात जोरदार राजकारण रंगलं आहे. नामांतराच्या मुद्यावरून महाविकास आघाडी मध्ये एकमत नसल्याने वातावरण चांगलंच तापलं होत. आज याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादावर जोरदार टीका केली होती. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? असं ट्विट करता शिवसेनेवर जोरदार निशाण साधला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारलं असता नामकरणापेक्षा त्या शहरांचा विकास होणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, आमचे काम विकासासाठी प्रयत्न करण्याचे आहे . त्यामुळे धाराशिव असुदे किंवा उस्मानाबाद पण वैद्यकिय महाविद्यालय होत आहे हे महत्वाचे आहे. शहराचा विकास करण्यासाठी सर्व पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी आम्हांला मंत्रीमंडळात घेतले असून विकासाचे काम करणे कर्तव्य आहे. समान कार्यक्रमाविषयी तीनही पक्षाचे वरिष्ठ सामंजश्याने निर्णय घेतील अस सांगितलं.
तसेच कोविन अँपच्या तांत्रिक बाबी दुरुस्त होण्यासाठी दोन दिवस लागतील अस केंद्र सरकार कडून सांगितलं गेल्याने लसीलरण दोन दिवस थांबलं असल्याचे सांगत त्यांनी काल झालेल्या दिवसभरात झालेल्या लसीकरणात कुणालाही काहीही त्रास झालेला नाही. लस अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे सर्वांनी लस घेऊन आपणही सुरक्षित राहावं व दुसर्यांनाही सुरक्षित करावं असं आव्हान देखील यावेळी केलं.
भारतात लसीची किंमत कमी असून सामान्य लोकांना मोफत लस देण्यावर सरकारचा भर असेल व केंदीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यामच्यात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये त्यांनी कोविन अँप मधील अडचण दूर करू व साडेसात लाख कमी आलेले लसीचे डोस पुन्हा देण्याचे मान्य केलं असल्याचे टोपे म्हणाले.