Home > News Update > देवकीनंद ठाकूर महाराज बरळले, सनातनी लोकांनी पाच सहा मुलांना जन्म देण्याचं केलं आवाहन

देवकीनंद ठाकूर महाराज बरळले, सनातनी लोकांनी पाच सहा मुलांना जन्म देण्याचं केलं आवाहन

देशातील सनातनी लोकांनी पाच ते सहा अपत्यांना जन्म द्यावा, असं वादग्रस्त वक्तव्य कथाकार देवकीनंद ठाकूर महाराज यांनी केले आहे.

देवकीनंद ठाकूर महाराज बरळले, सनातनी लोकांनी पाच सहा मुलांना जन्म देण्याचं केलं आवाहन
X

गेल्या काही वर्षांपासून देशात धार्मिक धृवीकरणाचा (religious polarization) प्रकार जोरात सुरु आहे. भाजपचे (BJP) नेते असो वा वेगवेगळ्या पीठाचे ढोंगी महंत यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य केले जात आहेत. त्यातच देवकीनंद ठाकूर (Devakinand Thakur Maharaj) या महाराजाने म्हटले आहे की, स्वातंत्र्यानंतर सनातनींवर सर्वात मोठा हल्ला झाला आहे. लोकसंख्या नियंत्रण आजपर्यंत झाले नाही. लोकसंख्येचा एवढा मोठा स्फोट झाला आहे की, कोणी विचारही करू शकत नाही. चार बायको चाळीस मुलं या वर कुणीच बोलत नसल्याचे देवकीनंद ठाकूर म्हणाले.

पुढे बोलताना देवकीनंद ठाकूर म्हणाले, जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायद्याची (Population Control Act) अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत प्रत्येक सनातनीला कमी-अधिक प्रमाणात मुले जन्माला घालायला हवीत. पाच-पाच, सहा-सहा मुलं व्हायला हवीत, असं बरळत मुला-मुलींना वेळेवर लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

याबरोबरच देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी सनातन मंडळ (Sanatan Mandal) स्थापन करण्याची मागणी केली आहे. आज अनेक ठिकाणी वक्फबोर्ड आहेत. त्यामुळे सनातन बोर्ड स्थापन करावे. या मंडळात सनातन धर्माचार्य असतील. मात्र केंद्र सरकारने हे आपल्या देखरेखी खाली ठेवावेत, असंही श्रीकृष्ण कथाकार देवकीनंद ठाकूर यांनी वक्तव्य केले.


Updated : 20 Feb 2023 7:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top