जानेवारी महिन्यात विक्रमी GST संकलन, पण महाराष्ट्राच्या वाट्याला काय? अजित पवार यांचा सवाल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर भाजपकडून त्याचे कौतूक करण्यात आले आहे. तर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्प चांगला असला तरी त्यातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.
X
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. त्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. तर जानेवारी महिन्यात विक्रमी जीएसटी कलेक्शन झाल्याची माहिती दिली. त्यावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली.
अजित पवार म्हणाले की, "देशाच्या अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. सर्व देशाचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष होतं. साहाजिक आम्ही विविध अर्थमंत्री आपआपल्या राज्याची जबाबदारी सांभाळत असतो आणि आमचं व आमच्या विभागाचंही त्याकडे बारकाईने लक्ष असतं.त्यामुळे हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वेगेवगळी राज्य आपला अर्थसंकल्प पुढील महिन्यात सादर करत असतात. त्यापार्श्वभुमीवर सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणूकांची धुम सुरू आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी निवडणूका समोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला. याबरोबरच अजित पवार म्हणाले की, विरोधक टीका करतच असतात. पण मी तसा माणूस नाही. मी चांगल्या गोष्टीला चांगले म्हणतो. पण या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलं? असा प्रश्न अर्थसंकल्प पाहिल्यानंतर पडला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, गेल्या महिन्यात देशात विक्रमी जीएसटी संकलन झाले. त्यापैकी सर्वाधिक जीएसटी महाराष्ट्रातून गोळा झाला. मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला अगदी तुटपुंजा निधी आला. तर ज्यांच्याकडून जास्त कर जमा होतो त्यांना झुकते माप देणे आवश्यक होते. पण अर्थसंकल्पात तसे झाले नाहीय त्यामुळे महाराष्ट्रावर दरवर्षी प्रमाणे यंदाही अन्याय करण्यात आल्याची प्रतिक्रीया अजित पवार यांनी व्यक्त केली.