Kirit Somaiya : कुणालाही पाठीशी घालणार नाही, फडणवीसांचे रोखठोक आदेश
X
किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ नंतर राज्याचे राजकारण तापले आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी काल किरीट सोमय्या यांच्या विरोधातील आठ तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिले. यावेळी त्यांनी त्यांच्यावर अनेक धक्कादायक असे आरोप केले. यामध्ये ही व्यक्ती ‘सेक्स्टॉर्शन’ करीत असून, असे उपरे दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात, ईडी, सीबीआयच्या नावाखाली विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात. केंद्रीय तपास यंत्रणेत आपल्या ओळखी असल्याचे सांगून महिलांशी संपर्क साधत तुमची शासकीय महामंडळात नियुक्ती करतो. विधान परिषदेवर घेतो, असे सांगून त्यांच्याशी जवळीक साधतात असे गंभीर आरोप त्यांनी केला..
अंबादास दानवे यांनी सभागृहात किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार आरोप केले. त्याचबरोबर राज्यातही विविध ठिकाणी किरीट सोमय यांच्या या कथित व्हायरल व्हिडिओच्या चौकशीची मागणी होऊ लागली. आता या संपूर्ण प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्याची घोषणा विधान परिषदेत केली. यावेळी त्यांनी याप्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही. याची सखोल चौकशी करण्यात येईल असा शब्द विरोधकांना दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात किरीट सोमय्या यांच्याअडचणीत वाढ होणार? की या चौकशीतून आणखीन काही समोर येणार? पाहावं लागणार आहे. बाकी राज्याचे सध्याचे राजकारण व इतर होणाऱ्या या सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...