Home > News Update > "मुद्दाम कुणाला त्रास द्यायची माझी भूमिका नाही"- अजित पवार

"मुद्दाम कुणाला त्रास द्यायची माझी भूमिका नाही"- अजित पवार

मुद्दाम कुणाला त्रास द्यायची माझी भूमिका नाही-  अजित पवार
X

बारामती :राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बारामती दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन केले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या व्यावसायिक संकुलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घेतली. सोबतच या संकुलाचे काम दर्जेदार करण्याबाबत अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी, "गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचं संकट आहे. यामुळे बऱ्याच गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. तरीही या काळात विकास कामं सुरू आहेत. सच्चर कमिटीच्या अहवालामध्ये अनेक गोष्टी आल्या आहेत. त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र, वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर काही गोष्टी सबुरीनं घ्याव्या लागतात." असं पवार म्हणाले.

अजित पवार यांना यावेळी बोलताना शरद पवार यांच्यामुळे आम्हाला भल्या पहाटे काम करण्याची सवय लागल्याचे म्हटले आहे.यामुळे अनेकजण थोडं दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही. मात्र मुद्दाम कुणाला त्रास द्यायची माझी भूमिका नाही. लवकर काम सुरू केलं की इतर कामांनाही वेळ देता येतो. असं अजित पवार यांनी सांगितलं.

Updated : 21 Aug 2021 10:03 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top